मुंबई :मेट्रो-३ मार्गिकेवर धावणाऱ्या मेट्रोच्या डब्यांच्या प्रतिकृतीचे अनावरण आज शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) मेट्रो-३ मेट्रोचे डब्बे बनविण्याचे काम अँलस्टाँम ट्रान्स्पोर्ट इंडिया लिमिटेड या कंपनीला दिलेले आहे. मेट्रो-३ या संपूर्णतः भूमिगत मेट्रो मार्गिकेला अॅक्वा लाईन असे संबोधले जाणार आहे. या डब्यांची रंगसंगती तसेच डब्यांची आंतर-बाह्य संरचना हा नावाला सुयोग्य अशी करण्यात येणार आहे.
कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मेट्रो -३ मार्गिकेसाठी आठ डब्यांच्या एकूण ३१ गाड्या अँलस्टाँम या कंत्राटदाराद्वारे बनविण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या मेक ईन इंडिया या संकल्पनेप्रमाणे मेट्रो-३ मार्गिकेच्या सर्व गाड्याची निर्मिती अँलस्टाँम इंडिया यांच्या श्री सिटी, आंध्र प्रदेश येथील कारखान्यात होणार आहे. मेट्रो-३ चे डब्बे अद्ययावत असतील तसेच विना चालक कार्यन्वयनासाठी सक्षम असणार आहेत, असे एमएमआरसीमार्फत सांगण्यात आले.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #mumbai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19